झेडपीतील फरशी घोटाळ्यास अधिकारीही जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:34+5:302020-12-13T04:40:34+5:30

ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम ठेकेदाराला देताना बाजारभावापेक्षा दुप्पट दर लावले आहेत. ठेकेदाराने लावलेल्या दराची ...

Officials are also responsible for the ZP floor scam | झेडपीतील फरशी घोटाळ्यास अधिकारीही जबाबदार

झेडपीतील फरशी घोटाळ्यास अधिकारीही जबाबदार

ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम ठेकेदाराला देताना बाजारभावापेक्षा दुप्पट दर लावले आहेत. ठेकेदाराने लावलेल्या दराची बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली पाहिजे होती. पण, त्याकडेही फारसे गांभीर्याने अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. दुरुस्तीचे काम करून वर्षही पूर्ण झाले नाही, तोपर्यंत तीन निविदांच्या फायली कशा गायब झाल्या आहेत. २४ लाखांचे कामही जिल्हा परिषदेत केले असूनही, त्याची मला कोणतीही कल्पना दिली नाही. बांधकाम विभागाच्या या सर्व चुकांचा मी स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. या चुकांना जो अधिकारी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही गुडेवार यांनी दिला आहे. येत्या आठ दिवसांत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी पूर्ण झाल्यानंतर कारवाईची जबाबदारी पुढील आठवड्यात निश्चित होणार आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Officials are also responsible for the ZP floor scam