कामे रखडल्यास अधिकारी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST2021-02-20T05:17:18+5:302021-02-20T05:17:18+5:30

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात पंचायत समितीची आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. चोरोची येथील हाय मास्ट ...

Officers are responsible if work is delayed | कामे रखडल्यास अधिकारी जबाबदार

कामे रखडल्यास अधिकारी जबाबदार

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात पंचायत समितीची आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. चोरोची येथील हाय मास्ट लाईटच्या कामाबाबत तक्रार आली असून त्या कामाची चौकशी करण्याचा ठराव करण्याचे आदेश सभापती विकास हाके यांनी दिले.

सदस्या सरिता शिंदे यांनी विविध लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीमधून पुढे पंचायत समितीला पाठविण्यात ग्रामसेवक दिरंगाई करत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. बऱ्याचदा त्रुटींची पूर्तता करण्यात वेळ घालवला जातो. त्यामुळे गरजू व्यक्ती शासकीय योजनेपासून वंचित राहत असल्याची तक्रारही शिंदे यांनी केली. दरम्यान, वारंवार अपूर्ण प्रस्ताव पाठवणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करू, असे गटविकास अधिकारी रवींद्र कणसे यांनी यावेळी सांगितले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे आवाहन केले. बिरोबा बनास जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे काढून साईडपट्ट्या भरण्याची मागणी माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांनी केली.

उपसभापती नीलम पवार, दीपकराव ओलेकर, सरिता शिंदे, जोत्स्ना माळी, सोनाली लोंढे, सरपंच आबासाहेब साबळे, गटशिक्षणाधिकारी आर. जी. पाटील, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव आदींसह अधिकारी उपस्थित होते.

चाैकट

रस्ते रुंदीकरणाची मागणी

बिरोबा बन येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने येथील वीस किलो मीटरपर्यंचे रस्ते दुहेरी व टिकाऊ दर्जाचे करावेत, अशी मागणी मराठा स्वराज्य संघाचे तालुकाध्यक शिवाजी देसाई यांनी केली. सभापती हाक्के यांनी लवकरात लवकर रस्ते दुपदरी करून घेतले जातील असे आश्वासन दिले.

Web Title: Officers are responsible if work is delayed