शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

महापालिकेची अनोखी संकल्पना, साकारले पहिले 'आठवण उद्यान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:42 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून दोन हजार वृक्षांचे रोपण करीत पर्यावरणाचा संदेश दिला.

सांगली : माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेने मिरज रस्त्यावरील खुल्या भूखंडावर पहिले 'आठवण उद्यान' उभारणीचे काम हाती घेतले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून या उ्दयानात दोन हजार वृक्षांचे रोपण करीत पर्यावरणाचा संदेश दिला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते आज, सोमवारी वृक्षारोपणाद्वारे या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली.महापालिकेने माझी वसुंधरा अंतर्गत वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यातच एक भाग म्हणून आयुक्त कापडणीस यांच्या संकल्पनेतून सांगली मिरज रोडवरील वसंतबागमधील दोन एकर जागेवर एक आठवण उद्यान साकारण्यात येत आहे. या उपक्रमात महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्व: खर्चातून दोन हजार झाडे लावण्यात आली.या उपक्रमाची सुरवात आयुक्तांनी वृक्षारोपण करून केली. ते म्हणाले की, महापालिका क्षेत्र हरित व्हावे, वसुंधरा संवर्धन व्हावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या उद्यानात वृक्ष लावणारे कर्मचारी अधिकारी आपल्या महापालिका सेवेच्या आठवणी वृक्षाबरोबर कायम ठेवणार आहेत. एक हरित आठवण म्हणून उद्यानाला लौकिक प्राप्त होईल, असे सांगितले.यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, एस. एस. खरात, नितीन शिंदे, अशोक कुंभार, मुख्य लेखाअधिकारी सुशीलकुमार केंबळे, आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण, पाणी पुरवठा अभियंता सुनील पाटील, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, नगर अभियंता आप्पा अलकुडे, जलनिस्सारण अभियंता तेजस शहा, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, कमलाकर कुलकर्णी उपस्थित होते.काय आहे 'आठवण उद्यान'महापालिकेच्या सेवेत सध्या दोन हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. पालिकेत बजाविलेल्या सेवेची आठवण रहावी, यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा संकल्प करण्यात आला. त्यातून मिरज रोडवरील पालिकेच्या दोन एकर जागेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून एकेक झाड लावत उद्यान साकारले आहे.

टॅग्स :Sangliसांगली