महेंद्र लाड यांच्या वाढदिनानिमित्त काेराेना याेद्ध्यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:36 IST2020-12-30T04:36:01+5:302020-12-30T04:36:01+5:30

या कार्यक्रमास सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, सर्जेराव पवार, कुंडल सरपंच प्रमिला पुजारी, ...

On the occasion of Mahendra Lad's birthday, Kareena Yadav's grief | महेंद्र लाड यांच्या वाढदिनानिमित्त काेराेना याेद्ध्यांचा गाैरव

महेंद्र लाड यांच्या वाढदिनानिमित्त काेराेना याेद्ध्यांचा गाैरव

या कार्यक्रमास सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, सर्जेराव पवार, कुंडल सरपंच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष बाळासाहेब लाड, पंचायत समिती माजी उपसभापती सुरेश खारगे उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब पवार म्हणाले, कोरोनासारख्या महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वाखाणण्याजोगे काम केले. हे काम करत असताना या याेद्ध्यांना कोरोनाची लागण झाली. त्यावर मात करून त्यांनी पुन्हा स्वत:ला कामात झोकून दिले. याच कामाची पोचपावती म्हणून महेंद्र लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या काेराेना याेद्ध्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास प्रताप ऊर्फ बाळासाहेब लाड, शशिकांत पवार, विक्रम लाड, नंदकुमार लाड, सुरेश पवार, अनिल कुंभार, पोपट थोरबोले, दिनकर जाधव, अशोक लाड, शमशुद्दीन मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य अमोल आवटे, अर्जुन कुंभार, किरण लाड, दीपाली पवार, राजाक्का कोळी, कुंडल पोलीस ठाण्याच्या पाेलीस निरीक्षक संगीता माने, डॉ. अमोल भोरे, ग्रामसेवक श्रीधर कुलकर्णी आदी उपस्थित होते. उपसरपंच माणिक पवार यांनी प्रास्ताविक, तर सरपंच प्रमिलाताई पुजारी यांनी आभार मानले.

Web Title: On the occasion of Mahendra Lad's birthday, Kareena Yadav's grief