शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीस धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:20 IST

लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे.

ठळक मुद्देविधानसभेच्या निमित्ताने पुन्हा कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीस धारमदनभाऊ पाटील गटाने मांडली स्वतंत्र चूल

सांगली : लोकसभा निवडणुकीत अनुभवास आलेली कॉँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या उमेदवारांना तिकीट मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मदनभाऊ पाटील गटाने मेळावा घेऊन स्वतंत्र चूल मांडली आहे.एकीकडे कॉँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे सूर जुळत असताना, कॉँग्रेसअंतर्गत गटबाजीने तोंड वर काढले आहे. लोकसभा निवडणुकीत अशाच भांडणातून सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली होती.

एकत्रित येऊन कॉँग्रेसचे नेते कोणताही निर्णय घेत नसल्याने पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. दीड महिन्यापूर्वी कॉँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत दादा गटातील काही कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर वातावरण शांत होते, मात्र गटबाजी धुमसतच होती.

पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारीसाठी तसेच निवडणुकीच्या तयारीसाठी प्रयत्न चालविले असताना, मंगळवारी मदन पाटील यांच्या समर्थकांनी जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी मेळावा घेतला.

या मेळाव्याला पृथ्वीराज पाटील यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. उमेदवारीची मागणी करणे किंवा त्यासाठी बैठका घेणे यात गैर काही नसले तरी, तिकीट न मिळाल्यास प्रत्येकवेळी कॉँग्रेसमधील एखादा गट नाराज होत असतो. कोणालाही उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करू, असे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले आहे, मात्र मदनभाऊ पाटील गटाने स्वतंत्र चूल मांडली आहे.

सर्वांना सोबत घेऊन एकसंधपणे लढण्यासाठी त्या गटाची मानसिकता दिसत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीनेही अनेकदा गटबाजी संपविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलेले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणSangliसांगली