लसीकरणातील अडथळे कायम, आज डोस येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:10+5:302021-04-25T04:27:10+5:30

सांगली : जिल्ह्यात लसीअभावी शनिवारीदेखील कोरोना लसीकरणाचा खोळंबा झाला. लस संपल्याने सर्वत्र लसीकरण ठप्प झाले. खासगी रुग्णालयांसह काही मोजक्या ...

Obstacles to vaccination remain, the dose will come today | लसीकरणातील अडथळे कायम, आज डोस येणार

लसीकरणातील अडथळे कायम, आज डोस येणार

सांगली : जिल्ह्यात लसीअभावी शनिवारीदेखील कोरोना लसीकरणाचा खोळंबा झाला. लस संपल्याने सर्वत्र लसीकरण ठप्प झाले. खासगी रुग्णालयांसह काही मोजक्या केंद्रांवर शिल्लक साठ्यातून २ हजार २०० जणांना लस टोचण्यात आली.

शुक्रवारी दुपारपासूनच ३७७ केंद्रांवर लसीकरण टप्प्याटप्प्याने थांबत गेले. काही मोजक्या केंद्रांवर जेमतेम लस शिल्लक होती, त्यातून २२४१ जणांना लस देण्यात आली. लस आणण्यासाठी शनिवारी सकाळीच सांगलीतून व्हॅन पुण्याला रवाना झाली होती. संध्याकाळी २५ हजार मात्र मिळाल्या. यादरम्यान, मुुंबईतून आणखी साठा पुण्याला निघाला, त्यातूनही सांगलीला काही डोस मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाने व्हॅन २५ हजार डोससह पुण्यातच थांबवून ठेवली. रात्री उशिरा मुंबईतून आलेल्या साठ्यातून काही अतिरिक्त डोस घेऊन व्हॅन सांगलीला रात्रीच निघेल. रविवारी सकाळपासून लसीकरण केंद्रांना लसींचे वितरण होईल. त्यानंतर लसीकरण सुरू पूर्ववत होणार आहे.

चौकट

शनिवारचे लसीकरण असे :

ग्रामीण - १,२१२

निमशहरी - २०१

शहरी - ३०३

खासगी रुग्णालये - ५२५

दिवसभरात एकूण - २२४१

आजअखेर एकूण - ४,८२,२७७

Web Title: Obstacles to vaccination remain, the dose will come today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.