ओबीसी आरक्षण भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:04+5:302021-06-27T04:18:04+5:30

फोटो ओळी : इस्लामपूर येथे भाजपच्या आंदोलनात विक्रम पाटील, विजय कुंभार, एस. के. पाटील, अल्ताफ तहसीलदार आदी उपस्थित होते. ...

OBC reservation BJP's agitation | ओबीसी आरक्षण भाजपचे आंदोलन

ओबीसी आरक्षण भाजपचे आंदोलन

फोटो ओळी : इस्लामपूर येथे भाजपच्या आंदोलनात विक्रम पाटील, विजय कुंभार, एस. के. पाटील, अल्ताफ तहसीलदार आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : ओबीसी आरक्षण मिळविण्यासाठी विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको आंदोलन झाले. पोलिसांनी पाटील यांच्यासह १०५ कार्यकर्त्यांसह अटक करून सुटका केली.

ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात महाआघाडी सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. इस्लामपूर शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील मुख्य रस्ता प्रांत ऑफिससमोर भाजप नेते विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

विक्रम पाटील म्हणाले, राज्य शासनाने जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय करून राजकारणापासून वंचित ठेवण्याचे काम महाआघाडी सरकारने केलेले आहे. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन तीव्र करण्यात येईल.

यावेळी रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार, एस. के. पाटील, अल्ताफ तहसीलदार, संदीपराज पवार, सचिन कचरे, मोहन वळसे, सिकंदर नायकवडी, समीर आगा, अजय खिलारे, राजेंद्र जोंजल, योगेश गोंदकर, भास्कर पाटोळे, प्रदीप पोळ उपस्थित होते.

Web Title: OBC reservation BJP's agitation