आटपाडीत पोषण माह अभियान सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:09+5:302021-09-04T04:31:09+5:30
आटपाडी : ‘सही पोषण, देश रोशन’ या उपक्रमातून बालकांना निरोगी व कुपोषनमुक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविका अहोरात्र काम करीत आहेत. ...

आटपाडीत पोषण माह अभियान सुरु
आटपाडी : ‘सही पोषण, देश रोशन’ या उपक्रमातून बालकांना निरोगी व कुपोषनमुक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविका अहोरात्र काम करीत आहेत. प्रत्येक बालकाकडे अंगणवाडी सेविका जातीने लक्ष देत असल्याचा अभिमान असल्याचे मत आटपाडीच्या सरपंच वृषाली पाटील यांनी व्यक्त केले.
आटपाडीत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पोषण माह साजरा केला जात आहे. यांच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, नितीन सागर, सर्जेराव राक्षे, शिवाजी लेंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोषण माह अंतर्गत लसीकरण, सुदृढ बालक-बालिका, बेटी बचाव बेटी पढाव अभियान, कुपोषणमुक्ती अभियान, माता पालक यांचा सक्रिय सहभाग असे उपकयम राबविले जाणार आहेत. कुपोषणमुक्त ग्रामपंचायतीसाठी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन वृषाली धनंजय पाटील यांनी केले.
सुमय्या मुरसल व उर्मिला सपाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रमेश चव्हाण, शिवाजीराव लेंगरे, बेबीताई पाटील, मंजुश्री पाटील आदी उपस्थित होते.