शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणाचा राग; सांगलीतील शासकीय रुग्णालयामधील परिचारिकेला बेदम मारहाण, पाच जणांविरोधात गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:20 IST

चांदीच्या शिक्क्यांसह ५१ हजारांचा ऐवजही लंपास 

सांगली : सांगलीतील शासकीय रुग्णालयातील परिचारिका विद्या सतीश जाधव (वय ३९, रा. पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. संशयितांनी त्यांच्या घरातून ५१ हजार रुपयांचा ऐवजही लंपास केला.जाधव यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अजितासिंग कापसे, माही कापसे, रजनीसिंग, सतबिरसिंग व पेपेसिंग (सर्व. रा. पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) यांच्याविरोधात गुन्हे नोंदविले. मारहाणीचा प्रकार १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान जाधव यांच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विद्या व संशयित अजितासिंग कापसे यांचे यापूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरुन अजितासिंग ही ७ एप्रिल रोजी चार ते पाच संशयितांना सोबत घेऊन विद्या यांच्या घरात आली. संशयितांपैकी पेपेसिंग व रजनीसिंग यांनी विद्या यांना धरुन ठेवले. अजितासिंग व माही यांनी विद्या यांना चप्पलने मारहाण केली. रजनीसिंग व पेपेसिंग यांनी विद्या यांना ‘तुला ठेवतच नाही’ असे धमकावत शिवीगाळ केली.संशयितांच्या मारहाणीला घाबरुन विद्या या शयनगृहात जाऊन लपल्या, त्यावेळी संशयितांनी शयनगृहाला बाहेरुन कडी लावली. घरातील साहित्याची नासधूस केली. देवघरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड व १००० रुपये किमतीचे चांदीचे दोन शिक्के चोरून नेले. यापैकी एक शिक्का सिनर्जी रुग्णालय नोंदवलेला व दुसरा कोरा होता.विद्या यांनी पोलिसांत तक्रार दिली, त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता ३०५, १८९(२), १८९(३), १२६(२), ३३३, ३२४(४), ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.