परिचारिका म्हणजे रुग्णालयांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:22+5:302021-05-13T04:27:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : परिचारक अथवा परिचारिका या रुग्णालयाचा श्वास असतात. डॉक्टर रुग्णावर उपचार करतात पण उपचारानंतर परिचारिकाच ...

The nurse is the breath of the hospital | परिचारिका म्हणजे रुग्णालयांचा श्वास

परिचारिका म्हणजे रुग्णालयांचा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : परिचारक अथवा परिचारिका या रुग्णालयाचा श्वास असतात. डॉक्टर रुग्णावर उपचार करतात पण उपचारानंतर परिचारिकाच रुग्णाची काळजी घेत असतात, असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आ. गाडगीळ यांनी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन येथील परिचारक व परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर वाघमारे, डॉ. सतीश अष्टेकर, डॉ. मनोज पवार, सीमा चव्हाण, परिसेविका अंजली वेदपाठक, राजेंद्र बन्ने, संजय सडकर, उषा गायकवाड, शैलजा सावर्डेकर, निर्मला मोहिते, प्रशांत कोळी, सचिन बिरंगे, गणपती साळुंखे उपस्थित होते.

मिरजेतील मिशन हॉस्पिटलमधील आया सौ. शांभवी अमोल आवळे यांचा आ. गाडगीळ यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सहा तोळ्यांची सोन्याची चेन त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: The nurse is the breath of the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.