जिल्हा कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्याच अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:30 IST2021-08-19T04:30:09+5:302021-08-19T04:30:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कमी श्रमात जादा पैसे मिळविण्याची हाव अनेक तरुणांना पोलिसांच्या रेकॉर्डवर आणत असून, चैनीसाठी केलेल्या ...

जिल्हा कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्याच अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कमी श्रमात जादा पैसे मिळविण्याची हाव अनेक तरुणांना पोलिसांच्या रेकॉर्डवर आणत असून, चैनीसाठी केलेल्या चोऱ्यांमुळे अनेक तरुण कारागृहाची हवा खात आहेत. जिल्हा कारागृहाची २३५ क्षमता असताना त्याच्या दुप्पट कैदी सध्या असून, यातील ७९ कैद्यांना शेजारच्याच शाळेत बंदी ठेवण्यात आले आहे. जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडी मिळालेले, कच्चे कैदी असून, अन्य गुन्ह्यातील कैद्यांना कळंबा येथे ठेवण्यात येत असते.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कारागृहात कच्च्या कैद्यांनाच ठेवण्यात येते. कोरोना संसर्गामुळे सध्या शाळाही बंद असल्याने कारागृह प्रशासनाने शेजारच्या एका शाळेतही कैद्यांना ठेवले आहे. हाताला काम नसल्याने चोरी, घरफोडी करणारे अनेकजण शिक्षा भोगत असून, न्यायालयीन कोठडीत असताना, जामीन न मिळालेल्या कैद्यांचे प्रमाण अधिक आहे.
कारागृहातील कैद्यांच्या वयोमानाचा विचार केला तर त्यात तरुणांचेच प्रमाण अधिक आहे. याशिवाय जामिनासाठी स्वत:हून प्रयत्न न करणारे अथवा नातेवाइकांनीही वाऱ्यावर सोडून दिलेल्या कच्च्या कैद्यांचेच प्रमाण अधिक आहे.
चौकट
कारागृहात कोणत्या गुन्ह्याचे किती कैदी?
चोरी ३०
घरफोडी २०
बलात्कार ५
खुनाचा प्रयत्न १०
खून ५
विनयभंग ५
इतर २५
चौकट
कोणत्या वयोगटातील किती कैदी (टक्क्यांमध्ये)
१८ ते २१ १५
२२ ते ३० ३०
३१ ते ४० २५
४१ ते ५० २०
५१ पेक्षा जास्त १०
चौकट
बिनकामाच्या तरुणांचाच भरणा
हाताला कोणतेही काम नसलेल्या आणि त्यातूनच चोऱ्या, घरफोडी, धाक दाखवून लुटण्याचे प्रकार करणाऱ्या तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कारागृहात शासकीय कर्मचारी नसून महिलांची संख्या ३०वर आहे.