सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ९६६ जणांना कोरोना निदान होतानाच ३० जणांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या वाढली असली तरी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण कायम असून ९७६ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ होतानाच दिवसांत ९ जण बाधित आढळले.
रविवारी सर्वात कमी ६०० रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारी पुन्हा त्यात ३७६ ने वाढ झाली. जिल्ह्यातील वाढते मृत्यूचे प्रमाण कायम असून ३० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ४, मिरज ३, कुपवाड १, वाळवा ६, जत, मिरज तालुक्यात प्रत्येकी ४, कवठेमहांकाळ ३, खानापूर २, आटपाडी, तासगाव, शिराळा तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने सोमवारी चाचण्यांचे प्रमाण वाढवताना आरटीपीसीआरअंतर्गत २९५३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४१९ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ४७१३ जणांच्या नमुने तपासणीतून ५६६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या ९ हजार ४६४ रुग्णांपैकी १४३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ११९५ जण ऑक्सिजनवर, तर २३४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील १९ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
चौकट
म्युकरमायकोसिसचे रुग्णसंख्येत सोमवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ९ जणांचे निदान झाले असून एकूण बाधितांची संख्या २१८ वर पोहोचली आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १२४६१५
उपचार घेत असलेले ९४६४
कोरोनामुक्त झालेले १११५५४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३५९७
पॉझिटिव्हिटी रेट १२.८४
सोमवारी दिवसभरात
सांगली ५८
मिरज १०
वाळवा २५६
मिरज तालुका १०७
कडेगाव ९८
खानापूर ८२
शिराळा ७९
पलूस, जत प्रत्येकी ६९
कवठेमहांकाळ ६३
तासगाव ४९
आटपाडी २६