रुग्णसंख्या घटली मात्र, म्युकर मायकोसिसचे दहा नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:36+5:302021-06-20T04:19:36+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी पुन्हा घट झाली. नव्या ७७० रुग्णांची नोंद झाली. मात्र एकाच दिवसात म्युकरमायकोसिसचे नवे ...

रुग्णसंख्या घटली मात्र, म्युकर मायकोसिसचे दहा नवे रुग्ण
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी पुन्हा घट झाली. नव्या ७७० रुग्णांची नोंद झाली. मात्र एकाच दिवसात म्युकरमायकोसिसचे नवे १० रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला, तर ९०७ जण कोरानामुक्त झाले.
चाचण्यांचे प्रमाण वाढविले असतानाही बाधितांची संख्या कमी होत सातशेच्या घरात आली. जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगलीत ३, मिरज ३, मिरज तालुक्यात ३, कडगाव, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यात प्रत्येकी २, आटपाडी, पलूस आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत घट होत सध्या ८९४७ जण उपचार घेत आहेत. यातील १०६१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८६४ जण ऑक्सिजनवर तर १९७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत २०५३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात २७३ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ७८२७ जणांच्या तपासणीतून ५३० जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू तर ३३ नवे रुग्ण उपचारास दाखल झाले.
चाैकट
म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत शनिवारी मोठी वाढ झाली. जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवसात १० जणांचे निदान झाले. यामुळे बाधितांची संख्या २६५वर पाेहोचली असून आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १३५५२५
उपचार घेत असलेले ८९४७
कोराेनामुक्त झालेले १२२७१२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३८६६
पॉझिटिव्हिटी रेट ८.१२
शनिवारी दिवसभरात
सांगली ९५
मिरज १५
आटपाडी ३९
कडेगाव ५९
खानापूर ३७
पलूस ७२
तासगाव ६३
जत ३३
कवठेमहांकाळ २३
मिरज तालुका ७१
शिराळा ७५
वाळवा १८८