शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मिरज शासकीय रूग्णालयात आयसीयु बेड्सची संख्या वाढविणार - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 6:22 PM

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

सांगली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालय आधार आहे. सध्या येथे ३५८ बेड्स कोरोना रूग्णांसाठी आहेत. उपजिल्हा रूग्णालये आणि ग्रामीण रूग्णालयातून पुढील उपचारांसाठी याठिकाणी रुग्ण पाठवले जातात त्यामुळे या रुग्णालयातील आयसीयु बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सध्या जिल्ह्यात १३ हजाराहून अधिक रूग्ण उपचार घेत आहेत. यात दररोज हजारांची वाढ होत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे सध्या ऑक्सिजनची गरज ४० टनापर्यंत गेली असून तुलनेने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे.अशा स्थितीत ऑक्सिजन प्लाँटची उभारणी लवकरात लवकर करावी. रुग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, वाढती रूग्णसंख्या पहाता मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णालयात आयसीयु बेड्स वाढविणे आवश्यक आहे. खाजगी रूग्णालयांच्या तुलनेत या रूग्णालयाची स्थिती चांगली आहे. आवश्यकता असल्यास यंत्रणाही उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. यावर पालकमंत्र्यांनी बेड्स वाढविण्याच्या व रेमडेविर इंजेक्शन व ऑक्सीजन वापराबाबत सूचना दिल्या.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलcorona virusकोरोना वायरस बातम्या