वाळवा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या तीनशेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:24+5:302021-04-07T04:27:24+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ५ एप्रिलपर्यंत २९८ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. त्यातील २०० ...

वाळवा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या तीनशेवर
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ५ एप्रिलपर्यंत २९८ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. त्यातील २०० जणांवर घरीच विलगीकरणात उपचार होत आहेत. ९८ व्यक्तींवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
तालुक्यात आतापर्यंत ६ हजार १८० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यातील ५ हजार ६१६ रुग्ण बरे झाले आहेत. २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांत १२ ठिकाणी ५०१ बेड्स उपलब्ध आहेत. इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कामेरी रस्त्यावरील कोविड केअर सेंटरमध्ये २८ आणि आष्टा येथे १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४३ रुग्णांवर इस्लामपूरच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. चार रुग्ण मिरज शासकीय कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोनाच्या प्रादुुर्भावाला आळा घालण्यासाठी संशयित रुग्णांचे ट्रेसिंग लवकर व्हावे, यासाठी आरटीपीसीआरच्या १२ हजार चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अॅन्टिजेनच्या ४६ हजार ५०८ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.