जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या घटली; ४१८ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:30+5:302021-08-29T04:26:30+5:30
सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी चांगलीच घट झाली. दिवसभरात ४१८ नवीन रुग्ण आढळले, तर परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील ...

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या घटली; ४१८ नवे रुग्ण
सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी चांगलीच घट झाली. दिवसभरात ४१८ नवीन रुग्ण आढळले, तर परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील ९ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा जास्त ५५३ जण कोराेनामुक्त झाले.
जिल्ह्यातील ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, खानापूर, तासगाव प्रत्येकी २, पलूस, कवठेमहांकाळ, वाळवा आणि मिरज तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत ५७७१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २३४ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ६१३५ जणांच्या नमुने तपासणीतून १९९ जणांना निदान झाले.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५६९ जण ऑक्सिजनवर, तर ८५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, तर नवीन १५ जण उपचारास जिल्ह्यात दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९१३११
उपचार घेत असलेले ३८३४
कोरोनामुक्त झालेले १८२४५०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५०२७
शनिवारी दिवसभरात
सांगली २५
मिरज ९
आटपाडी ६६
कडेगाव ३१
खानापूर ४२
पलूस २७
तासगाव ४८
जत १९
कवठेमहांकाळ ८
मिरज तालुका ५७
शिराळा १९
वाळवा ६७