तासगावात सख्ख्या भावावर खुनीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST2020-12-22T04:26:39+5:302020-12-22T04:26:39+5:30

याप्रकरणी सागर चंद्रकांत थोरात याच्यावर तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सुनीता ...

Number of brothers killed in Tasgaon | तासगावात सख्ख्या भावावर खुनीहल्ला

तासगावात सख्ख्या भावावर खुनीहल्ला

याप्रकरणी सागर चंद्रकांत थोरात याच्यावर तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सुनीता दत्तात्रय थोरात यांनी याची फिर्याद दिली आहे.

फर्यादीत म्हटले आहे की, दत्तात्रय हे पत्नी, आई, वडील, तीन मुली, भाऊ किरण व सागर यांच्यासोबत राहतात. सागरची पत्नी गेल्या पाच वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे. सागर व त्याचा मुलगा आदित्य हे दत्तात्रय यांच्यासोबत राहतात. सागर यास दारूचे व्यसन आहे. तो दत्तात्रय यांच्याकडे, राहते घर विकून त्याचे पैसे द्यावेत, अशी वारंवार मागणी करत होता.

रविवारी रात्री याच कारणातून वाद झाला. यावेळी सागरने दारूच्या नशेत दत्तात्रय यांना चाकूने भोसकले. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेला लहान भाऊ किरण हाही जखमी झाला. दत्तात्रय यांना उपचारासाठी प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सागर थोरात यास अटक केली आहे.

Web Title: Number of brothers killed in Tasgaon