विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एनएसएस उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:41+5:302021-09-25T04:28:41+5:30
शिरढोण : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना अतिशय उपयुक्त उपक्रम आहे, असे प्रतिपादन प्रा. शशिकांत पोरे यांनी केले. ...

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एनएसएस उपयुक्त
शिरढोण : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना अतिशय उपयुक्त उपक्रम आहे, असे प्रतिपादन प्रा. शशिकांत पोरे यांनी केले.
कवठेमहांकाळ येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रातर्फे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) दिनानिमित्त तालुक्यातील अलकुड (एम) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राध्यापक पोरे बोलत होते.
मुख्याध्यापक दीपक कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सतीश पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, अभ्यास केंद्राचे संयोजक सतीश पाटील, कालिंदी शिंदे, सुप्रिया पिसे, अश्विनी होनराव, आम्रपाली चंदनशिवे, सायली कोरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : अलकुड (एम) येथील जिल्हा परिषद शाळेत प्रा. शशिकांत पोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले.
240921\img-20210924-wa0024.jpg
अलकुड एम बातमी फोटो