शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वसंतदादा बँक विलीनीकरणास ‘एनपीए’चा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 02:03 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील विलीनीकरणास मोठ्या रकमेच्या ‘एनपीए’चा अडथळा निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्याचे पर्याय जिल्हा बॅँक

ठळक मुद्देथकीत कर्जाचा डोंगर : जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अभ्यास सुरू; नियुक्त समितीमार्फत सादर होणार अहवाल

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील विलीनीकरणास मोठ्या रकमेच्या ‘एनपीए’चा अडथळा निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्याचे पर्याय जिल्हा बॅँक प्रशासनाकडून शोधले जात असले तरी, याबाबतचा निर्णय त्यामुळे लांबणीवर पडणार आहे.

शेतकरी बँकेचे विलीनीकरण जिल्हा बँकेत करण्याच्या मुद्द्यावर एक अभ्यास समिती नेमली आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. बँकेचे दोन संचालक, सरव्यवस्थापक, चार्टर्ड अकौंटंट यांचा या समितीत समावेश आहे. अवसायनातील वसंतदादा शेतकरी बॅँकेने वाटप केलेले नियमबाह्य कर्जच बॅँकेच्या डबघाईस कारणीभूत ठरले. बॅँकेच्या तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांवर याप्रकरणी ठपकाही ठेवण्यात आला आहे.

सहकार विभागामार्फत घोटाळ्याची चौकशी सध्या रेंगाळली असली तरी, बॅँकेच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. वसंतदादा बॅँकेच्या अवसायकांनी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बॅँक वाचविण्यासाठी बरीच धडपड केली. अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.वसंतदादा बॅँकेची सध्याची कर्ज थकबाकी १६५ कोटी रुपयांची आहे. ही वसुली अत्यंत अडचणीची असून, त्याचाच प्रमुख अडथळा सांगली जिल्हा बॅँकेला वाटत आहे.

विनातारणी ७३ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीचा मुद्दाही सतावणार आहे. बॅँकेच्या मालमत्तांची एकूण किंमत ४० कोटींच्या घरात जाते. कर्जाचा डोेंगर मोठा असून, ठेवीदारांच्या ठेवी देण्याचे बंधनही बॅँकेवर आहे. बॅँकेला १५८ कोटी रुपयांच्या ठेवी द्यायच्या आहेत. यामध्ये तब्बल १०६ कोटी रुपये हे मोठ्या संस्थांचे आहेत. यामध्ये महापालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच मोठ्या पतसंस्थांचा समावेश आहे. वसंतदादा बॅँक वाचावी म्हणून अनेकजण धडपडत असले तरी, सद्यस्थितीत कोणताही मार्ग मिळत नसल्याचे दिसत आहे.अहवालानंतर होणार फैसला...जिल्हा बँकेचा सध्याचा एनपीए ४३६ कोटी रुपयांचा आहे. वसंतदादा बँकेच्या विलीनीकरणानंतर यात दीडशे कोटी रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे एनपीए वाढत असताना विलीनीकरणाचा कोणताही लाभ सध्या दिसत नाही. त्यामुळे यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेला कमीत कमी नुकसान सोसून वसंतदादा बॅँकेचे अस्तित्व राखणे व त्यातून जिल्हा बॅँकेला लाभ मिळणे, अशा अंगाने सध्या अभ्यास समिती आकडेमोड करीत आहे. अभ्यास समितीच्या अहवालानंतरच प्रत्यक्ष संचालक मंडळामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :bankबँकMONEYपैसाSangliसांगली