शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आता आरोग्य विभागही घेणार तुमच्या कुटुंबातील गर्भवतीची काळजी, प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत कमी करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:38 IST

जिल्ह्यात वर्षाकाठी सरासरी ४५ हजार बालके जन्मतात. त्यातील किमान १० टक्के अतिजोखमीच्या ठरतात.

सांगली : तुमच्या कुटुंबातील गर्भवतीची काळजी आता जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही घेणार आहे. यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले असून, गर्भवतींशी संपर्क करून प्रकृतीविषयी सल्ला, चौकशी व मार्गदर्शन दिले जाणार आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व आरोग्याधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम महिन्याभरापूर्वी सुरू करण्यात आला. आजवर दीड हजार गर्भवतींशी संपर्क करण्यात आला आहे. दररोज प्रत्येक तालुक्यातील १० ते १५ गर्भवतींशी संपर्क साधण्यात येतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली जाते. आहारविषयक सल्ला दिला जातो. औषधांचा वापर, होणारा त्रास, रक्तदाब आणि मधुमेह, अन्य आजार यांची माहिती घेतली जाते. त्यावर उपचारांसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्काचा सल्ला दिला जातो. प्रसंगी जवळच्या सरकारी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना गर्भवतीशी संपर्क साधून मदतीची सूचना केली जाते. या उपक्रमातून अतिजोखमीच्या प्रसूतींची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे. जास्त वयात प्रसूती, अपुऱ्या दिवसांचा गर्भ, जास्त संख्येने बाळंतपणे या श्रेणीतील गर्भवती अतिजोखमीच्या ठरतात. कॉल सेंटरवरील समुपदेशनाद्वारे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाईल. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे.वर्षाकाठी ४५ हजार प्रसूतीजिल्ह्यात वर्षाकाठी सरासरी ४५ हजार बालके जन्मतात. त्यातील किमान १० टक्के अतिजोखमीच्या ठरतात. गर्भावस्थेच्या काळातच त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत कमी करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

टॅग्स :SangliसांगलीHealthआरोग्यPregnancyप्रेग्नंसी