आता साठमारी सरपंचपदासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:44+5:302021-01-20T04:26:44+5:30
ग्रामपंचायत निवडणूक निकालातून जनतेचा कल कोणाकडे आहे, हे पुरते स्पष्ट झाले आहे. मतदारांनी कॉंग्रेसला भरभरून पाठिंबा दिला आहे. आता ...

आता साठमारी सरपंचपदासाठी
ग्रामपंचायत निवडणूक निकालातून जनतेचा कल कोणाकडे आहे, हे पुरते स्पष्ट झाले आहे. मतदारांनी कॉंग्रेसला भरभरून पाठिंबा दिला आहे. आता सरपंचपदासाठी आरक्षणानुसार प्रत्येक गावात उमेदवार देऊ. अनेक गावांत कॉंग्रेसचेच उमेदवार बाहेरुन लढले असले तरी ते पक्षाच्याच पाठीशी राहतील. याचा फायदा गावाच्या विकासासाठी करून घेऊ.
- मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस.
कोट
भाजप सत्तेवर आलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत वरिष्ठांची सुकाणू समिती नेमणार आहोत. त्याद्वारे गावांच्या विकासासाठी कार्यक्रम निश्चित केले जातील. कोठेही एकाधिकारशाही चालू देणार नाही. भाजपची धोरणे देशहिताची असल्याचेच जनतेने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मान्य केले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. सरपंचपदासाठी आरक्षण निघेल त्यानुसार उमेदवार दिले जातील.
- दीपक शिंदे-म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष
------------