शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्वाभिमानी शेतकरीची आता नव्याने बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 11:44 PM

दक्षिण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ताकदीवर ज्यांनी निवडणुकीत यश मिळवले, ते सरकारबरोबर गेले. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापासून दुरावले. परिणामी राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव झाला. राज्यात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. शेवटपर्यंत त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळेच आता त्यांनी ‘सात-बारा कोरा’ हे आंदोलन हाती घेऊन संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच उग्ररूप धारण केले.

ठळक मुद्देउर्जितावस्थेसाठी आंदोलन : रयत क्रांती संघटनेत शांतता

अशोक पाटील ।इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मिळालेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. राज्यातील सत्तेतही वाटा मिळाला नाही. त्यामुळे संघटनेत मरगळ येण्याची भीती होती. म्हणून त्यांनी संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी बुधवारी शेतकरी आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले. बुधवारी उग्र आंदोलन करून त्यांनी अजूनही ‘स्वाभिमानी’ची ताकद राज्यभर जिवंत असल्याचे दाखवून दिले. तर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेतकरी संघटनेत मात्र अद्याप शांतता दिसत आहे.

दक्षिण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ताकदीवर ज्यांनी निवडणुकीत यश मिळवले, ते सरकारबरोबर गेले. त्यामुळे शेतकरी त्यांच्यापासून दुरावले. परिणामी राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव झाला. राज्यात त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. शेवटपर्यंत त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळेच आता त्यांनी ‘सात-बारा कोरा’ हे आंदोलन हाती घेऊन संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच उग्ररूप धारण केले.

दरम्यान माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचा झेंडा रोवला. मुलगा सागर याला भाजपमध्ये पाठवले. भविष्यातील राजकीय खुर्ची भक्कम व्हावी, याची काळजी त्यांनी घेतली. दुसरीकडे राजू शेट्टी यांनी साखरसम्राट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी हातमिळवणी केली. याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला.

विधानसभेत भाजपची सत्ता येईल, म्हणून सदाभाऊ खोत यांची गाडी बेफाम होती. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोटारीवर ‘स्वाभिमानी’ने कडकनाथ कोंबड्या भिरकावत ‘रयत क्रांती’ला टार्गेट केले. ‘रयत क्रांती’ची हवा विरळ झाली. भाजपविरोधी महाविकास आघाडी सत्तेत आली. आणि खोत यांच्याकडे फक्त विधानपरिषदेचे सदस्यत्व राहिले.

अवकाळी पाऊस व महापुरामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला. त्यावेळी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले. परंतु महाविकास आघाडीने ते आश्वासन पाळले नाही. हाच मुद्दा पुढे करून शेतकरी संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी राजू शेट्टी हे पुन्हा आंदोलनाचे हत्यार घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. यातून संघटना खरंच बाळसं धरेल का, हे येणारा काळच ठरवेल.

  • पुन्हा एकत्र : आल्यास...

लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी एकत्र आले आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हाच धागा पकडत जर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना पुन्हा एकत्र आल्या, तर वावगे ठरू नये.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना