आता पुस्तकांचीही होम डिलिव्हरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:21+5:302021-08-25T04:31:21+5:30

मिरज : पुस्तक आणण्यासाठी वाचनालयात जाणे त्रासदायक ठरत असल्यास ते स्वत:च तुमच्या दारात येणार आहे. मिरजेत मिरज विद्यार्थी संघाच्या ...

Now home delivery of books too | आता पुस्तकांचीही होम डिलिव्हरी

आता पुस्तकांचीही होम डिलिव्हरी

मिरज : पुस्तक आणण्यासाठी वाचनालयात जाणे त्रासदायक ठरत असल्यास ते स्वत:च तुमच्या दारात येणार आहे. मिरजेत मिरज विद्यार्थी संघाच्या खरे मंदिर वाचनालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.

१५ ऑक्टोबर या वाचन प्रेरणा दिवसापासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल. वाचनालयाचे अनेक सभासद वयोवृद्ध आहेत. काही सभासद दूर अंतरावर राहतात. वेळेअभावी प्रत्यक्ष वाचनालयात येणे त्यांना शक्य होत नाही. अनेक महिलांना पुस्तक वाचनाची आवड आहे; पण वाचनालयात जाणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन खरे मंदिर वाचनालयाने वाचनालयाने तुमच्या दारी उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत वाचनालयातील सुमारे दहा हजार पुस्तकांची यादी वाचकांना दिली जाईल. त्यातून निवडलेल्या पुस्तकाचे नाव संस्थेला कळवायचे आहे. ग्रंथालयाचा कर्मचारी आठवड्यातून एकदा घरी येऊन पुस्तक देऊन जाईल. या सेवेसाठी नाममात्र शुल्क घेतले जाणार आहे.

Web Title: Now home delivery of books too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.