शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आता अैाषधी चहामुळे अर्भके जन्मतील निरोगी आणि ठणठणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:21 IST

Tea Health : जन्मणारे मूल निरोगी आणि ठणठणीत असावे यासाठी गर्भवतींनी आता चहा पिला तरी पुरेसे होणार आहे. अर्थात, हा चहा साधासुधा नसेल, तर अ‍ौषधी गुणधर्मांनी युक्त असेल.

ठळक मुद्देआता अैाषधी चहामुळे अर्भके जन्मतील निरोगी आणि ठणठणीत!

संतोष भिसे सांगली : जन्मणारे मूल निरोगी आणि ठणठणीत असावे यासाठी गर्भवतींनी आता चहा पिला तरी पुरेसे होणार आहे. अर्थात, हा चहा साधासुधा नसेल, तर अ‍ौषधी गुणधर्मांनी युक्त असेल.याबाबतचे संशोधन ब्रिटीश जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. अभिमानाची बाब म्हणजे या संशोधनामध्ये सांगलीकर बालकांनी सहभाग नोंदवला आहे. गर्भवतीमध्ये फॉलिक ॲसिड आणि ब १२ जीवनसत्वाची कमतरता असल्यास अर्भकांमध्ये मज्जारज्जू आणि मेंदुविकारांचा धोका असतो.

कायमचे अपंगत्व किंवा मतिमंदत्व ही त्याची पुढील पायरी असते. हा धोका टाळण्यासाठी सध्या गर्भावस्थेतच गोळ्या देऊन जीवनसत्वाची उणिव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो, तरीही दरवर्षी लाखो मुलांना या दुर्धर आजारांना तोंड द्यावे लागते.हे लक्षात घेऊन भारतीय उपखंडात चहामधून जीवनसत्व देण्याची संकल्पना पुढे आली. अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातील प्रा. अशोक ॲन्थनी व डॉ. गॉडफ्रे ऑकले ही जोडगोळी अनेक वर्षांपासून यावर संशोधन करत आहे. त्यांनी सांगलीत येऊन गेली तीन वर्षे डॉ. रवींद्र व्होरा यांच्यासोबत संशोधनात्मक काम केले. त्यासाठी डॉ. संतोष करमरकर, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. मयूर सोनी, डॉ. अपूर्वा झरकर व मानवराहत ट्रस्ट यांनीही सहकार्य केले.सांगलीतील प्रयोगाचे समाधानकारक निष्कर्षसांगलीत एका खासगी बालरुग्णालयातील ५० गर्भवतींना चहामधून अ‍ौषध दिले. त्याचे निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आले. शरिरातील फॉलीक ॲसिड व ब १२ जीवनसत्वाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यामुळे संशोधकांचा उत्साह दुणावला. भविष्यात भारती विद्यार्थीनी तसेच तासगाव तालुका व गडचिरोलीतील मुलींना अ‍ौषधाची मात्रा चहाव्दारे दिली जाणार आहे. चहा कंपन्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा अ‍ौषधी चहा देशभरातील पात्र महिलांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रक्तवाहिन्यातील गुठळ्या टाळण्यासाठीही फॉलिक ॲसिड व ब १२ जीवनसत्व गरजेचे असते, त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांनाही हा अ‍ौषधी चहा दिला जाणार आहे. हा चहा अ‍ौषधी असला तरी चवीला नेहमीसारखाच असेल. या प्रयोगाची व्यापकता भविष्यात वाढवली जाणार आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलने या संशोधनाच्या प्राथमिक निष्कर्षांना मान्यता दिली आहे.- डॉ. रवींद्र व्होरा,सांगली.

टॅग्स :Healthआरोग्यHealthy Diet Planपौष्टिक आहारSangliसांगली