शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: रेठरेधरणमधील कुख्यात गुंड भावशा पाटीलला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 18:16 IST

हल्ल्यानंतर त्याने हातातील रक्ताळलेला कोयता नाचवत दहशत निर्माण करताना, ‘माझे नाव सांगेल त्याला जिवंत ठेवणार नाही, म्हवण्या ॲक्सिडेंटमध्ये मेला, असे सांगायचे’, अशी दमदाटी करत पळून गेला होता.

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील कुख्यात गुंड भावशा ऊर्फ भाऊसाहेब वसंतराव पाटील (वय ४४) याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या खटल्यात दोषी धरले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील पहिले जिल्हा न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी त्याला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम जखमी मोहन पाटील यांच्या वारसांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.भावशा पाटीलने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी दोन वर्षे साधा कारावास भोगावा लागणार आहे. खुनाच्या प्रयत्नाची ही घटना १७ वर्षांपूर्वी २७ जानेवारी २००६ रोजी रेठरेधरण गावातील बसस्थानक परिसरात घडली होती. याबाबत संभाजी दादासाहेब पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादी पक्षाकडून अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, भावशा पाटील आणि दादासाहेब पाटील-खंडागळे यांच्यामध्ये वैमनस्य होते. जखमी मोहन रंगराव पाटील (वय ६०) त्याच्या शेजारी राहत होते. मात्र, खंडागळे कुटुंबाशी त्यांची मैत्री असल्याने त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते. मोहन पाटील आपली माहिती खंडागळे कुटुंबाला देतात, असा संशय आणि राग भावशाला असायचा. याच रागातून त्याने २७ जानेवारी २००६ रोजी मोहन पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यानंतर त्याने हातातील रक्ताळलेला कोयता नाचवत दहशत निर्माण करताना, ‘माझे नाव सांगेल त्याला जिवंत ठेवणार नाही, म्हवण्या ॲक्सिडेंटमध्ये मेला, असे सांगायचे’, अशी दमदाटी करत पळून गेला होता.भावशाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. भावशाने मोहन पाटील यांना जिवे ठार मारण्याचा उद्देशानेच हल्ला केला. त्यानंतर त्याने अनेक गुन्हे केले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल आहे. त्याला जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.वैद्यकीय अहवालावर लागली शिक्षाभावशाच्या दहशतीला घाबरून अनेक साक्षीदार फितूर झाले. यातील जखमी मोहन पाटील यांचेही काही वर्षांनी निधन झाले. तपास अधिकारी व्ही. एन. चव्हाण यांचेही निधन झाले. मात्र, फिर्यादी संभाजी पाटील आणि वैद्यकीय अहवालात आरोपीच्या अंगावरील जप्त कपड्यावर जखमी मोहन पाटील यांच्या रक्ताचे नमुने सापडल्याचा निष्कर्ष आल्याने हे पुरावे ग्राह्य धरून न्या. गांधी यांनी भावशाला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे आणि हवालदार सुनील पाटील यांनी सरकार पक्षाला मदत केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय