शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सग्यासोयऱ्यांबाबत अधिसूचना म्हणजे अंतिम निर्णय नव्हे- चंद्रशेखर बावनकुळे

By अविनाश कोळी | Updated: January 30, 2024 21:11 IST

आक्षेप नोंदविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध

सांगली : सरकारने कुणबींच्या सग्यासोयऱ्यांनाही दाखले देण्याबाबत जी अधिसूचना काढली आहे, त्यावर हरकती व सुचना मागविल्या आहेत. हा अंतिम निर्णय नाही. ओबीसी नेते किंवा अन्य कोणालाही अन्याय झाल्याचे वाटत असेल तर त्यांना आक्षेप नोंदविण्याची संधी आहे. आक्षेपांवर सुनावणी होऊन याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

सांगलीत भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी पावले टाकली, ती योग्य आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना दोन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यांना पूर्वीप्रमाणे ओबीसी आरक्षण मिळेल. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, त्या मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मराठा समाजाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न असेल. कायद्याने टिकणारे आरक्षण त्यांना मिळेल.

ते म्हणाले, भाजपने महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी वचनपूर्ती केली तोच आमचा निवडणुकीचा अजेंडा असेल. केलेली कामे घेऊनच आम्ही मतदारांपुढे जाणार आहोत.

मंत्री, आमदारांमध्ये वाद नाहीतराज्यात मराठा व ओबीसी असा वाद नाही. यावरुन सत्तेत असलेल्या मंत्री, आमदारांमध्ये मतभेद असण्याचे कोणतेही कारण नाही. छगन भुजबळ किंवा अन्य नेत्यांना अधिसूचनेबाबत काही आक्षेप असतील तर त्यांना ते नोंदविण्याची संधी आहे. कोणावरही अन्याय होईल, असा निर्णय सरकार घेणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती नाहीबावनकुळे म्हणाले की, भाजपने प्रचार कार्यालये सुरु केली म्हणजे निवडणूक कार्यक्रमाची आम्हाला माहिती झालीय, असा अर्थ कुणी लावू नये. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. २०१९ चा कार्यक्रम पाहून आम्ही स्वत:चा अंदाज बांधून तयारी केली आहे.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMaratha Reservationमराठा आरक्षण