शिक्षण सेवक पतसंस्थेच्या थकीत कर्जदाराना नोटीस : ऊर्मिला राजमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:59+5:302021-09-26T04:27:59+5:30
संजयनगर : सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना नियम १०१ अंतर्गत नोटीस बजावणार असल्याचे संस्थेच्या प्राधिकृत ...

शिक्षण सेवक पतसंस्थेच्या थकीत कर्जदाराना नोटीस : ऊर्मिला राजमाने
संजयनगर : सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना नियम १०१ अंतर्गत नोटीस बजावणार असल्याचे संस्थेच्या प्राधिकृत मंडळ अध्यक्षा ऊर्मिला राजमाने यांनी सांगितले.
सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या सात संचालकांनी राजीनामे दिले असल्याने संस्था कोरम पूर्ण होत नाही. संचालक मंडळास कोणताही निर्णय घेता येत नाही. यामुळे संस्थेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासक अध्यक्षांनी संस्थेच्या कर्जाचा आढावा घेतला. त्यामध्ये काही कर्ज जुनी आहेत. त्यांच्यावर वसुलीसाठी कलम १०१ अंतर्गत नाेटीस बजावणार असल्याचे सांगितले.
संस्थेत कोणताही गैरव्यवहार, भ्रष्टाचार झालेला नाही. संचालक मंडळ अल्पमतात आल्याने त्यांनी संस्थेच्या प्रशासकीय कर्मचारी व प्रशासन मंडळ यांच्या झालेल्या बैठकीत कर्मचारी सूचना दिल्या आहेत. यावेळी अनिल कोळी, मिलिंद वाझे, उत्तम लाड, सर्व शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.