जिल्हा परिषदेच्या सोसायटी अध्यक्षास नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:37+5:302021-03-30T04:16:37+5:30
जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक दि. २५ मार्च रोजी सांगलीत झाली. यापूर्वी दि. १५ मार्च रोजी संबंधित ...

जिल्हा परिषदेच्या सोसायटी अध्यक्षास नोटीस
जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक दि. २५ मार्च रोजी सांगलीत झाली. यापूर्वी दि. १५ मार्च रोजी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर, दि. २१ मार्च रोजीही अहवाल पॉझिटिव्हच आला असताना तो सभेला उपस्थित राहिला. तो जत येथून सांगलीला आला. सोसायटी सभेला उपस्थित राहून अध्यक्षपदही स्वीकारले. तो कोरोना पॉझिटिव्ह आहे, याची उपस्थितांपैकी जवळपास सर्वांना माहिती होती. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तात्पुरत्या अहवालाचा दावा करीत त्याने बैठकीस उपस्थिती लावली.
याबाबत डुडी म्हणाले की, संबंधित कर्मचाऱ्याकडून झालेले कृत्य गंभीर आहे. याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना चौकशी करून तत्काळ अहवाल देण्याची सूचना दिली आहे. त्या आरोग्य कर्मचाऱ्यास नोटीस देऊन खुलासा मागविला आहे. खुलाशानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू.
चौकट
अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्यासाठी हालचाली
आरोग्य विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा व पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.