शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा : सांगली जिल्'ात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 21:39 IST

या नोटिसीमध्ये विश्रामबाग, कुंडल, तासगाव आदी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ११ गुन्'ांचा संदर्भ देण्यात आला आहे. कारवाई करूनही आपल्याकडून वारंवार गुन्हे होत असल्याने मालमत्तेस नुकसान पोहोचेल व यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याचेही म्हटले आहे.

ठळक मुद्देबुधवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक कार्यालयात या कार्यकर्त्यांना म्हणणे सादर करण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे व भागवत जाधव या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी तडीपारीच्या नोटिसा बजाविल्या आहेत. कडकनाथ कोंबडीपालन फसवणूकप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांप्रमाणे बजाविण्यात आलेल्या या नोटिसांमध्ये, म्हणणे सादर करावे अन्यथा दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाºयाांना थेट तडीपारीच्या नोटिसा आल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना ही नोटीस शहर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी पाठवली आहे. मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. यात म्हटले आहे की, विविध अपराधांसंबंधीचे गुन्हे आपल्यावर दाखल असून, न्यायालयातून जामीन मंजूर झाल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे आपल्याकडून होत आहेत.

या नोटिसीमध्ये विश्रामबाग, कुंडल, तासगाव आदी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ११ गुन्'ांचा संदर्भ देण्यात आला आहे. कारवाई करूनही आपल्याकडून वारंवार गुन्हे होत असल्याने मालमत्तेस नुकसान पोहोचेल व यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याचेही म्हटले आहे. तुम्ही जनतेस धोका निर्माण करू शकता, त्यामुळेच मिरजेच्या प्रांताधिकाºयांकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही नोटिसीत म्हटले आहे.बुधवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक कार्यालयात या कार्यकर्त्यांना म्हणणे सादर करण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा बजाविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.शुक्रवारी होणार निर्णयपोलीस उपअधीक्षकांनी नोटीस बजाविल्यानंतर खराडे व जाधव यांनी बुधवारी उपस्थित राहत म्हणणे मांडले. पत्रानुसार दाखल केलेल्या गुन्'ांची माहिती करून घेण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्याची मागणी करण्यात आली. यावर येत्या शुक्रवारी (दि. ११) आणखी अवधी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाministerमंत्रीPoliceपोलिस