दारूसाठी पैसे न दिल्याने भिकाऱ्याच्या डोक्यात वीट घातली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST2021-07-17T04:22:23+5:302021-07-17T04:22:23+5:30

मिरज : मिरजेत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन अज्ञाताने अपंग भिकाऱ्याच्या डोक्यात वीट मारुन त्याला जखमी केले. मिरजेत ...

Not paying for the liquor put a brick in the beggar's head | दारूसाठी पैसे न दिल्याने भिकाऱ्याच्या डोक्यात वीट घातली

दारूसाठी पैसे न दिल्याने भिकाऱ्याच्या डोक्यात वीट घातली

मिरज : मिरजेत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन अज्ञाताने अपंग भिकाऱ्याच्या डोक्यात वीट मारुन त्याला जखमी केले.

मिरजेत मिरासाहेब दर्गा परिसरात भीक मागणारा अपंग भिकारी सचिन विठ्ठल जाधव (वय ३३, रा. मिरासाहेब दर्गा, मिरज) याच्याकडे अज्ञाताने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सचिन जाधव याने त्याला पैसे दिले नाहीत, त्यामुळे अज्ञाताने ‘तुला बघून घेतो’ अशी धमकी देत तेथे पडलेली वीट अपंग भिकारी जाधव याच्या डोक्यात मारुन पलायन केले. यावेळी डोक्यात वीट लागल्याने सचिन जाधव हा गंभीर जखमी झाला. त्याला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत त्याने मिरज शहर पोलिसात अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Not paying for the liquor put a brick in the beggar's head