शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

Gram Panchayat Election: असं ही एक गाव! फलकबाजीशिवाय रंगला प्रचार, गेल्या २२ वर्षांपूर्वीपासूनची परंपरा

By श्रीनिवास नागे | Updated: December 15, 2022 19:07 IST

ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात सोशल मीडियासह डिजिटल फलकबाजीने आघाडी घेतली आहे. पण..

विटा (जि. सांगली) : ग्रामपंचायत निवडणुकीचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. प्रचारासाठी सोशल मीडियासह डिजिटल फलकबाजीने आघाडी घेतली आहे; परंतु खानापूर तालुक्यातील चिखलहोळ या गावात प्रचाराचा एकही फलक दिसत नाही. केवळ घराघरात पदयात्रेद्वारे प्रचाराचे तंत्र वापरणारे हे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे.खानापूर तालुक्यात निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात सुरू असून सर्वच गावांत विद्यमान आमदार अनिल बाबर विरुद्ध माजी आमदार सदाशिवराव पाटील गटात संघर्ष सुरू आहे. चिखलहोळ या गावातही हे दोन गट समोरासमोर आहेत. सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी असून येथे एका अपक्षासह तीन उमेदवार रिंगणात आहेत.चिखलहोळ उच्च सुशिक्षित तरुण आणि अधिकाऱ्यांचे गाव म्हणून परिचित आहे. या गावातील अनेक जण प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर काम करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीपुरतेच स्थानिक राजकारण करणाऱ्या या गावाने संपूर्ण जिल्ह्याला आदर्श घालून दिला आहेत. या गावात दोन गटांत सत्तेसाठी सामना रंगला असताना प्रचारही जोमात सुरू आहे. सोशल मीडिया, डिजिटल बॅनर आदींमुळे प्रचाराचा धुरळा उडत असताना संपूर्ण  गावात दोन्ही गटांचे प्रचाराचे एकही डिजिटल फलक दिसत नाहीत.

सलोख्याचे वातावरणगेल्या २२ वर्षांपूर्वीपासून डिजिटल बॅनरबाजी टाळली असून ती परंपरा नव्या पिढीनेही सुरू ठेवली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचार आणि निकालापर्यंत व त्यानंतरही या गावात सलोख्याचे वातावरण कायम राहिले आहे. वैचारिक सलोखा जपणाऱ्या आणि सुमारे १८०० मतदार असणाऱ्या या गावात निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी एकही फलक झळकला नाही, हे विशेष.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक