शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

ना टेस्टिंग, ना लसीकरण, तिसरी लाट रोखणार तर कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST

सांगली : शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारअखेर महापालिका क्षेत्रात २०९ रुग्ण सापडले, ...

सांगली : शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारअखेर महापालिका क्षेत्रात २०९ रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात १०१९ बाधित सापडले. ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव अनियंत्रित होत असल्याचे दिसत आहे. मोठा गावांमध्ये सद्य:स्थितीला सरासरी ३०० हून अधिक रुग्ण आहेत. सात लाख लोकसंख्येच्या महापालिका क्षेत्रात रविवारी २०९ रुग्ण सापडले, त्या तुलनेत २५ लाख लोकसंख्येच्या ग्रामीण भागात तब्बल ११४० रुग्ण सापडले. यावरून ग्रामीण भागातील फैलावाचा वेग ध्यानी यावा. चाचणी न करताच फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवरही नियंत्रण नाही. सजग नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत असले तरी त्यांच्यासाठी लसही मिळेना झाली आहे. या स्थितीत कोरोनाची तिसरी लाट आवरणार कशी, असा गंभीर प्रश्न आहे. तासगाव, जत, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, खानापूर, वाळवा या तालुक्यांत रुग्णसंख्या पाच हजारांपेक्षा जास्त आहे. चाचण्यांची संख्या वाढविली तर आणखी रुग्ण सापडतील हे निश्चित.

चौकट

कर्नाटक सीमाभागातून घुसखोरी

जत आणि मिरज तालुक्यांलगत कर्नाटक राज्याची सीमा आहे. तेथून कर्नाटकातील कोरोनाबाधित मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील गावांत येत आहेत. रस्त्यावर खड्डे खोदून वाहतूक थांबविली असली तरी लोक मात्र येतच आहेत. आपल्या गावांत रुग्णालयांत तपासणी केली तर बोभाटा होण्याच्या भीतीने ते महाराष्ट्रातील गावात येत आहेत. त्यांना रोखणे हाताबाहेर गेले आहे, शिवाय त्यांच्यामुळेही ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

चौकट

ग्रामीण भागात अनियंत्रित फैलाव

- कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भाग सावध होता पण दुसऱ्या लाटेत गाफिल राहिल्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात ४० गावांमध्ये किमान ५० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मोठ्या गावांत तर ३०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत.

- जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा आलेख खालावल्यानंतर ग्रामीण भाग बेसावध झाला. दुसऱ्या वाटेची तयारी केली नाही. मार्च-एप्रिलमध्ये हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली तरी लाटेला तोंड देण्याची कोणतीही तयारी नव्हती. ग्रामीण प्रशासन आणि आरोग्य विभागही बेसावध राहिला.

- एप्रिल-मे महिन्यांत प्रत्यक्ष रुग्णसंख्या वाढली तरी संस्थात्मक विलगीकरणाची तयारी नव्हती. सर्वांचा भर होम आयसोलेशनवर होता. रुग्ण सापडला तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नव्हते. कन्टेन्मेन्ट झोन, अैाषध फवारणी याचा पत्ता नव्हता. अनेक गावांत रुग्ण उघडउघड रस्त्यांवर फिरत राहिले.

- जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाल्यावर ग्रामपंचायती हलल्या. दक्षता समित्या कामाला लागल्या. काही गावांनी कोविड केअर सेंटर्स सुरू केली. गावे स्वत:हून सील केली, पण तोपर्यंत कोरोनाने हात-पाय पसरले होते.

चौकट

लसीसाठी प्रचंड धावाधाव

एकिकडे कोरोना हल्ला करत असताना त्याला थोपविण्यासाठी लसही उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांना आठवड्यातून एक-दोनदा २०० ते ४०० डोस मिळताहेत. कार्यक्षेत्रातील गावांच्या वाट्याला ५०-१०० लसी येत असून यामुळे रस्सीखेच सुरू आहे. भिलवडीसारख्या काही गावांत तर हाणामाऱ्याही झाल्या. लसीकरण केंद्रांसमोर पहाटेपासूनच लोक रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. १८ ते ४४ वयोगटांच्या लसीकरणाची टक्केवारी तर अत्यंत कमी आहे. त्यामुळेही तिसऱ्या लाटेला चालना मिळण्याची भीती बळावत आहे.

चौकट

पलूस, वाळव्यात चाचण्या घटल्या

पलूस आणि वाळवा तालुक्यात चाचण्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी (दि.९) पलूस तालुक्यात आरटीपीसीआरचे २८ नमुने घेतले, तर रॅपिड ॲंटिजनच्या ४७ चाचण्यांमधून १३ कोरोनाबाधित निष्पन्न झाले. वाळवा तालुक्यात एकही आरटीपीसीआर चाचणी झाली नाही, तर रॅपिड ॲंटिजनच्या फक्त ४८ चाचण्या झाल्या, त्यातून १० जण पॉझिटीव्ह निघाले. खानापुरातही चाचण्यांचे प्रमाण कमी होते. आरटीपीसीआरसाठी ४५ नमुने घेतले तर रॅपिड ॲंटिजनच्या ५६ चाचण्यांत २० पॉझिटिव्ह निघाले. ही टक्केवारी पाहता चाचण्या वाढविल्या तर खूपच मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडतील हे स्पष्ट आहे.

कोट

कोरोनाच्या साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागातील अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. पॉझिटीव्ह रुग्ण आढळताच त्याचे त्वरित कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे तसेच त्यांचे होम आयसोलेशन करण्याचे आदेश दिले आहेत. आयसोलेशनचा भंग केल्यास गुन्हेही दाखल करणार आहोत. गावातील कोरोना साखळी तोडण्याची जबाबदारी ग्रामदक्षता समित्यांचीही आहे.

- जितेेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील एकूण रुग्ण - ९०,७५४

सध्या उपचार घेतल असलेले रुग्ण - १६,९६८

गृहविलगीकरणातील रुग्ण - १३,५६९

शहरातील रुग्ण - १३,१४७

ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण - ६६,१००

आरोग्य कर्मचारी ४१,६९२

फ्रंटलाईन वर्कर्स ३४,७७४

ज्येष्ठ नागरिक २,७१५६३

४५ ते ५९ वर्षे २४३३६०

१८ ते ४४ वर्षे ७,१८३

तालुकानिहाय रविवारच्या (दि.९) रॅपिड चाचण्या व पॉझिटिव्ह रुग्ण

तालुका चाचण्या पॉझिटिव्ह

मिरज २३२ ६७

आटपाडी ३४१ १०५

कडेगाव २८३ ५३

खानापूर ५६ २०

पलूस ४७ १३

तासगाव २९७ ६८

जत १९५ ६८

कवठेमहांकाळ १३७ ४२

शिराळा ११७ ३६

वाळवा ४८ १०

आतापर्यंत झालेले लसीकरण

डोस आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर्स ज्येष्ठ नागरिक ४५ ते ५९ वर्षे १८ ते ४४ वर्षे

उद्दिष्ट २८,२२४ ११२९३ ३,२०,००० ६,३०,००० १७,५०,०००

पहिला डोस २६,२९४ २५,५४२ २,३३,००८ २,२५,६७१ ७,१८३

दुसरा डोस १५,३९८ ९२३२ ३८,५५५ १७६८९ ०००