लॉकडाऊनमध्ये सलून व्यावसायिकांवर निर्बंध नकोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:25+5:302021-04-06T04:25:25+5:30
सांगली : लॉकडाऊन काळात सलून व्यावसायिकांवर बंधने घालू नयेत, सलून दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक महामंडळाने ...

लॉकडाऊनमध्ये सलून व्यावसायिकांवर निर्बंध नकोत
सांगली : लॉकडाऊन काळात सलून व्यावसायिकांवर बंधने घालू नयेत, सलून दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक महामंडळाने केली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार सलून दुकानेही बंद ठेवायची आहेत. नाभिक महामंडळाने त्याला विरोध केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरातील लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने राज्यभरात अनेक नाभिकांनी आत्महत्याही केल्या आहेत. कारागिरांचा संपूर्ण चरितार्थ सलून व पार्लरवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे अन्य पर्यायी व्यवसाय नाहीत. त्यामुळे सलूनवर निर्बंध लादू नयेत. कोरोनाची काळजी घेऊन आम्ही व्यवसाय करू, तशी परवानगी द्यावी.
यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेल्या नाभिकांना शासनाने कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही, याचा विचार करून यावेळी सलूनवर निर्बंध लादू नयेत, अन्यथा नाभिक व्यावसायिक तीव्र आंदोलन छेडतील.
निवेदनावर सोमनाथ साळुंखे, तेजस सन्मुख यांच्या सह्या आहेत.