शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपवासी झालेल्यांकडून काँग्रेसचा राजीनामा नाही! : विधानसभेनंतर पुन्हा चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:19 IST

दरम्यान, रेड येथे १५ सप्टेंबररोजी काँग्रेसची बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. यानंतर देशमुख यांनी कोकरूड जिल्हा परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता.

ठळक मुद्दे शिराळा तालुक्यातील चित्र

विकास शहाशिराळा : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील काही जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांनी अद्याप पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे सदस्य अद्यापही काँग्रेसमध्ये आहेत, की भाजपमध्ये, याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.

गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. फक्त या तालुक्यात काँग्रेस आघाडी म्हणजे काँग्रेसचे नेते शिवाजीराव देशमुख व राष्टÑवादीचे आमदार मानसिंगराव नाईक गट एकत्र, तर त्यांच्याविरुद्ध भाजपमधून माजी आमदार शिवाजीराव नाईक गट अशी लढत झाली होती. यामध्ये जिल्हा परिषदेच्या चारपैकी प्रत्येकी दोन जागा काँग्रेस व राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या, तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी चार राष्ट्रवादी, तीन काँग्रेस व एक जागा भाजपने जिंकली होती.

दरम्यान, रेड येथे १५ सप्टेंबररोजी काँग्रेसची बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. यानंतर देशमुख यांनी कोकरूड जिल्हा परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला होता. आता या जिल्हा परिषद गटाची निवडणूक घेण्याच्यादृष्टीने शासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मात्र पणुंब्रे तर्फ वारूण गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शारदा पाटील, पंचायत समितीच्या सभापती माया कांबळे (मांगले), अमर पाटील (बिळाशी), पांडुरंग पाटील (आरळा) हे तीन पंचायत समिती सदस्य काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. त्यांनी मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे चौघे अजून काँग्रेसचे की भाजपचे आहेत, याची चर्चा सुरू आहे....म्हणून देशमुख यांचा राजीनामासत्यजित देशमुख यांना भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. जर त्यांना काँग्रेसने पक्षातून काढले असते व त्यांच्यावर पक्षीय कारवाई झाली असती, तर त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता आली नसती. त्यामुळे त्यांनी पदाचा लगेच राजीनामा दिला होता, असे देशमुख गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तिघात लढतीची शक्यताशिराळा तालुक्यात कोकरूड जिल्हा परिषद गटव २४ ठिकाणी ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी जिल्हा परिषद निवडणूक भाजपच्या अस्मितेची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची असणार आहे. कोकरूड गट काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथे काँग्रेसची उमेदवारी कोणाला, असा प्रश्न आहे. तर सद्यस्थितीत भाजप, राष्ट्रवादी-कॉँग्रेस व महाडिक युवा शक्ती यांच्यात लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीcongressकाँग्रेस