शेतीच्या पाण्यामध्ये राजकारण नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:50+5:302021-02-06T04:49:50+5:30
‘विश्वास’चे कार्यकारी संचालक राम पाटील, ‘प्रचिती दूध’चे अध्यक्ष अमरसिंह नाईक, उपाध्यक्ष प्रकाश धस, संचालक विष्णू पाटील, सम्राटसिंह नाईक, विराज ...

शेतीच्या पाण्यामध्ये राजकारण नको
‘विश्वास’चे कार्यकारी संचालक राम पाटील, ‘प्रचिती दूध’चे अध्यक्ष अमरसिंह नाईक, उपाध्यक्ष प्रकाश धस, संचालक विष्णू पाटील, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक, पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष नीलेश काटके, दिलीप भोगावकर, विजय रोकडे, आनंदा शिराळकर, नामदेव साळुंखे, भालचंद्र पवार आदी उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, शंभर दिवसात वारणा नदीचे पाणी दुरंदेवाडीत पोहोचणार आहे. गट-तट विसरून एकत्रित येऊन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावा.
यावेळी पी.आर. पोतदार, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, सरपंच विनोद पन्हाळकर, सौ. शकुंतला पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास बापूराव पवार, बाळकृष्ण पवार, रामचंद्र मुदगे, आनंदा भुरके उपस्थित होते. उपसरपंच भास्कर पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक अविनाश पवार यांनी केले. सूत्रसंचालन आनंदा पाटील यांनी केले. आभार धोंडीराम पवार यांनी मानले.
फोटो : कुसाईवाडी (शिराळा) येथे कुसाईमाता पाणी योजनेच्या कामाचा प्रारंभ करताना आमदार मानसिंहराव नाईक. शेजारी अमरसिंह नाईक, प्रकाश धस, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक, विष्णू पाटील उपस्थित होते.