दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:33+5:302021-03-24T04:24:33+5:30
सांगली : मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज चार महिन्यांपर्यंत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांनी गर्दी करू ...

दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी नको
सांगली : मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज चार महिन्यांपर्यंत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांनी गर्दी करू नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी साहेबराव दुतोंडे यांनी केले आहे.
स्थावर मिळकतीच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्काची सवलत जाहीर केली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील १३ दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी होत आहे, त्यामुळे दुतोंडे यांनी असे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मार्चअखेरीस निबंधक कार्यालयात गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. दस्ताचे पैसे भरल्यापासून चार महिन्यांपर्यंत कधीही ते नोंदविता येतात, त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळून कार्यालयात यावे असे दुतोंडे म्हणाले. सध्या मार्चअखेर असल्याने दस्ताचे व्यवहार करण्यासाठी जिल्हाभरातील निबंधक कार्यालयात गर्दी होत आहे. शासनाने ग्रामीण व शहरी भागासाठी दस्तामध्ये सवलत दिल्यानेही गर्दी होत आहे, ती टाळावी असे दुतोंडे म्हणाले.