शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गाव गाठण्यासाठी सुरु केला पायी प्रवास, पैसेच नाहीत, मग गावाकडे कसे जायचं? तामिळनाडूच्या तरुणासमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:35 IST

अंकली फाटा येथे पोलिसांनी त्यांना अडवून माघारी पाठविले. पण ते कुपवाडला न परतता फळ मार्केटच्या आसपास एका ठिकाणी बसून होते. याची माहिती मिळताच नगरसेविका सवीता मदने यांनी या तरुणांची भेट घेतली.

ठळक मुद्देसांगलीत पोलिसांनी अडविले, महापालिकेकडून जेवणाची व्यवस्था, नगरसेविकाने घातली समजूत

सांगली : तामिळनाडूतील काही तरुण लॉकडाऊनपासून सांगलीत अडकून पडले आहे. त्यापैकी २० तरुणांनी तिकीटाचे पैसे नसल्याने घराच्या ओढीने पायीच परतण्याचा निर्णय घेतला. पण या तरुणांना मंगळवारी सकाळी अंकली नाक्यावर पोलिसांनी अडवून परत पाठविले. नगरसेविका सविता मदने यांनी समजूत काढून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. महापालिकेने त्यांना मुळ निवासाच्या ठिकाणी पोहोच केले. पण तिकीटाच्या पैशाचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. परप्रांतिय मजूर, कामगार, विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली जात आहे.

त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अर्जही भरून घेतले जात आहेत. अशातच आता काहींना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी पैसाची चणचण भासू लागल्याचे समोर येत आहे. असाच प्रकार मंगळवारी सांगलीत घडला. तामिळनाडू येथील ६०० हून अधिक तरुण एका मार्केटिंग कंपनीत प्रशिक्षणासाठी आले होते. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद झाली. महिन्याभरापूर्वी हे सर्व तरुण पायीच त्यांच्या राज्यात जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा पोलिस उपअधिक्षक संदीपसिंह गील यांना त्यांची समजूत काढून माघारी आणले. त्यानंतर महापालिकेने या तरुणांच्या जेवण्याची व्यवस्था केली. काही तरुण महापालिकेच्या निवारा केंद्रात आश्रयाला आले तर काहीजण पूर्वी रहात असलेल्या खोल्यामध्ये परतले.

आता परप्रांतिय तरुण, मजूरांना त्यांच्या मुळ गावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तरुणांपैकी काहींनी जिल्हा प्रशासनाकडे अर्जही करण्यास सुरूवात केली आहे. त्यातील २० तरुणांना पैसे नसल्याने वेगळी चिंता सतावत होती. भविष्यात तामिळनाडूला जाण्यासाठी रेल्वे अथवा बसची व्यवस्था झाली तर त्याच्या तिकीटाचे पैसे कोठून आणयाचे असा प्रश्न या तरुणांसमोर होता. त्यामुळे त्यांनी पायीच परतण्याचा निर्णय घेत पहाटेच्या सुमारास बाहेर पडले. कुपवाडपासून ते अंकलीमार्गे निघाले होते. अंकली फाटा येथे पोलिसांनी त्यांना अडवून माघारी पाठविले. पण ते कुपवाडला न परतता फळ मार्केटच्या आसपास एका ठिकाणी बसून होते. याची माहिती मिळताच नगरसेविका सवीता मदने यांनी या तरुणांची भेट घेतली. त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधत समजूत काढली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशीही त्यांनी संपर्क केला.

आयुक्तांनी तातडीने सहाय्यक आयुक्त सावंता खरात यांना घटनास्थळी पाठविले. नगरसेविका मदने, सहाय्यक आयुक्त खरात यांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच महापालिकेने त्यांना त्यांच्या निवासस्थळी परत पोहोच केले. पण त्यांच्या पैशांचा प्रश्न मात्र सुटलेला नसल्याने तरुणांच्या चिंता कमी झालेली नव्हती.

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस