वारणालीतील त्या जागेवर रुग्णालय नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:46+5:302021-05-18T04:27:46+5:30
सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचे खरेदीपत्र बेकायदेशीर आहे. ‘त्या’ जागेवर हॉस्पिटल उभारू नये, अशी मागणी ...

वारणालीतील त्या जागेवर रुग्णालय नको
सांगली : वारणाली येथील महापालिकेच्या नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचे खरेदीपत्र बेकायदेशीर आहे. ‘त्या’ जागेवर हॉस्पिटल उभारू नये, अशी मागणी जागेचे मूळ मालक आशिष पाटील व शीतल पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील स. न. १९१ अ/१ २ पैकी ३१३६ चौ. मी. या मिळकतीवर कम्युनिटी हेल्थ सेंटरचे आरक्षण होते. मात्र, आरक्षण ठेवल्यापासून दहा वर्षांत ही जागा महापालिकेने संपादित केलेली नाही. त्यामुळे दि. २४ ऑगस्ट २०१८ रोजी महापालिकेला नोटीस दिली होती. महापालिकेस दिलेल्या नोटीसनुसार त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे सांगलीत दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. तो प्रलंबित आहे. दरम्यान, एका व्यक्तीने त्यांना अधिकार नसताना महापालिकेला दि. २२ जुलै २००६ रोजी बेकायदेशीर खरेदीपत्र करून दिले आहे. मिळकत खरेदी करताना मिळकत मालकांना नोटीस द्यावी लागते. त्याप्रमाणे नोटीस दिलेली नाही. संबंधित व्यक्तीला मिळकत विक्रीचा अधिकार दिलेला नसताना त्याने महापालिकेच्या नावे बेकायदेशीरपणे खरेदीपत्र करून दिले आहे. त्यामुळे ही मिळकतीवर हॉस्पिटल उभारू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.