शिरगाव पुलाबाबत श्रेयवाद नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:41+5:302021-04-25T04:26:41+5:30

ते म्हणाले की, वाळवा-शिरगाव पुलासाठी महाविकास आघाडीने केंद्राकडे निधी मिळण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. राज्याच्या महाविकास ...

No credit for Shirgaon bridge | शिरगाव पुलाबाबत श्रेयवाद नको

शिरगाव पुलाबाबत श्रेयवाद नको

ते म्हणाले की, वाळवा-शिरगाव पुलासाठी महाविकास आघाडीने केंद्राकडे निधी मिळण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आमच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे जलसंपदामंत्री जयंत पाटील दोघेही आहेत. शिवाय जयंत पाटील या मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर मी खासदार आहे. जिल्ह्याकडून राज्याला द्यावयाच्या प्रस्तावाला त्यांच्या सहीची आवश्यकता आहे. कोरोना काळात एवढी रक्कम मिळणे अवघड आहे, परंतु ती मिळाली आहे. राजकीय श्रेयवादात न अडकता महाविकास आघाडी सरकारने हे काम केल्याचे मान्य करावे.

खासदार माने म्हणाले की, या मतदारसंघाचे नेतृत्व जलसंपदामंत्री जयंत पाटील करतात. मी लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून केंद्रात प्रतिनिधित्व करत आहे. केंद्रीय निधी राज्याच्या प्रस्तावानेच मिळतो. जयंत पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावला. शिवसेना या सरकारमध्ये असल्याने याला आमचा विरोध नाही. पूल उभारणे महत्त्वाचे आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, उपसरपंच पोपट अहिर, तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदू पाटील, उद्योजक उमेश घोरपडे, संजय अहिर, मानाजी सापकर, सरपंच डाॅ.शुभांगी माळी उपस्थित होते.

Web Title: No credit for Shirgaon bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.