महापालिकेकडून कुपवाडमध्ये २१८ जणांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:49+5:302021-06-30T04:17:49+5:30
कुपवाड : महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरातील रस्त्यावर आणि बाजारपेठेतील नागरिकांची ...

महापालिकेकडून कुपवाडमध्ये २१८ जणांची कोरोना तपासणी
कुपवाड : महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरातील रस्त्यावर आणि बाजारपेठेतील नागरिकांची आरटीपीसीआर,अँटिजन तपासणी केली. यामध्ये २१८ जणांची तपासणी केली असून त्यातील दोनजण पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. मयूर औंधकर यांनी दिली आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी कापडणीस हे सहायक आयुक्त, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले. शहरात विनामास्क फिरणारे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, भाजीपाला बाजारपेठेत आलेले ग्राहक, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अशा २१८ नागरिकांची अँटिजन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये अँटिजन १५०, आरटीपीसीआर ६८ आहेत. त्यातील २ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर औंधकर, वंदना राठोड, स्वाती सुतार, प्रियांका माळी, मनीषा माळवदे, प्रियांका दबडे, ज्योती कांबळे, खंडेराव भाळे, महेश पिसे, बबन रोढे यांनी या मोहिमेत भाग घेतला होता.