इस्लामपुरात नितीन मदनेची मिरवणूक

By Admin | Updated: September 4, 2014 00:03 IST2014-09-03T23:44:42+5:302014-09-04T00:03:39+5:30

शहरात जल्लोष : राष्ट्रीय कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल सत्कार

Nitin Madan procession in Islampur | इस्लामपुरात नितीन मदनेची मिरवणूक

इस्लामपुरात नितीन मदनेची मिरवणूक

इस्लामपूर : कोरियातील आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन शशिकांत मदने याचे शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. भारताच्या संघातील निवडीनंतर आज दुपारी हैदराबाद येथून नितीनचे शहरात आगमन झाले. त्यावेळी पंचायत समितीचा परिसर कबड्डीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
येथील इस्लामपूर व्यायाम मंडळाचा खेळाडू असणाऱ्या नितीनची पंचायत समितीपासून मिरवणूक काढण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करून नितीन मदने व प्रो-कबड्डीमध्ये तेलगू टायटन्सकडून खेळलेला राष्ट्रीय खेळाडू सचिन शिंगाडे या दोघांसह त्यांचे प्रशिक्षक पोपट पाटील, प्रा. वीरसेन पाटील, मानसिंग पाटील, आनंदराव वडाद, सतीश मोरे यांच्या सहभागाने उघड्या जीपमधून मिरवणुकीस सुरुवात झाली. शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक गेली. जुन्या तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यांना नितीन व सचिनने पुष्पहार घालून अभिवादन केले.
मोटारसायकल रॅलीसह निघालेली ही जल्लोषी मिरवणूक शहरवासीयांच्या अभिमानाचा विषय ठरला. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीसह या दोघा कबड्डीविरांचे औक्षण व पुष्पहार घालून क्रीडारसिकांनी स्वागत केले. कबड्डीतील विक्रमादित्य नितीन, प्रत्येक चढाईत प्रतिस्पर्धी टिपतानाच बोनस गुण मिळविणारा नितीन, घारीच्या नजरेने व चित्त्याच्या चपळाईने प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवणारा नितीन अशा जयघोषात सहकारी कबड्डी खेळाडूंनी जल्लोष केला. यावेळी बहुसंख्य तरूण उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Nitin Madan procession in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.