शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेतील ‘घरपट्टी’च्या निवृत्त लिपिकाकडे ३५ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, चौकशीत निष्पन्न

By घनशाम नवाथे | Updated: June 18, 2025 17:20 IST

लाचखोरीच्या चौकशीत निष्पन्न

घनशाम नवाथे सांगली : महापालिकेतील घरपट्टी विभागातील निवृत्त लाचखोर कर्मचारी नितीन भिमराव उत्तुरे (वय ६३, रा. सांगलीकर मळा, मिरज) याने सेवा काळात १९ वर्षात ३५ लाख १६ हजार १९२ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले. उत्तुरे याच्यासह त्याला प्रोत्साहन देणारी पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.महापालिकेतील घरपट्टी विभागात लिपिक पदावर कार्यरत असताना नितीन उत्तुरे याने २०१९ मध्ये घरपट्टी कमी करण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेव्हा सापळा रचून त्याला अटक केली होती. मिरज शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तुरे याच्या मालमत्तेची चौकशी सुरू होती.

नितीन उत्तुरेसह पत्नीवर गुन्हा दाखल उत्तुरे याने या काळात तब्बल ३५ लाख १६ हजार १९२ रूपयांची मालमत्ता भ्रष्ट कारभारातून मिळवली. त्यासाठी पत्नी वंदना उत्तुरे हिने प्रोत्साहन दिले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक विनायक भिलारे यांनी ही चौकशी केली. उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात बेहिशोबी मालमत्तेबाबत फिर्याद दिली. त्यानुसार नितीन उत्तुरे व पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अंमलदार सुदर्शन पाटील, प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, वीणा जाधव, विठ्ठल रजपूत यांचा चौकशी पथकात समावेश होता.                        

बेहिशोबी मालमत्तेची तक्रार कराजिल्ह्यातील लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याबाबत खात्रीशीर माहिती असल्यास त्याबाबत तक्रार द्यावी. तसेच लाचेच्या मागणीबद्दलही टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा ०२३३-२३७३०९५ या क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन उपअधीक्षक अनिल कटके यांनी केले.