शेटफळेच्या सरपंचपदी नीता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:52+5:302021-02-10T04:25:52+5:30

करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नीता चंद्रकांत गायकवाड तर उपसरपंचपदी निवृत्ती भागवत गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. ...

Nita Gaikwad as the Sarpanch of Shetphale | शेटफळेच्या सरपंचपदी नीता गायकवाड

शेटफळेच्या सरपंचपदी नीता गायकवाड

करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नीता चंद्रकांत गायकवाड तर उपसरपंचपदी निवृत्ती भागवत गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. एकहाती सत्ता स्थापन करत शिवसेनेने शेटफळे ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला.

ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर व आटपाडी तालुक्याचे शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड यांनी तेरापैकी नऊ जागा जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर केले होते. शेटफळे ग्रामपंचायतीवर राजेंद्रआण्णा देशमुख व अमरसिंह देशमुख यांची निर्विवाद सत्ता होती. या सत्तेला सुरुंग लावत सोमनाथ गायकवाड व शिवसेनेच्या शिलेदारांनी एकहाती सत्ता काबीज केली. सरपंचपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. त्यामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने नीता गायकवाड यांची सरपंचपदी निवड झाली. निवृत्ती गायकवाड यांना उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. बी. शेंडगे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, शारदा गायकवाड, सुप्रिया गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे, ग्रामविकास अधिकारी एल. ए. सनदी, प्रा. सी. पी. गायकवाड, वामनराव गायकवाड, ज्ञानेश्वर जावळे, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Nita Gaikwad as the Sarpanch of Shetphale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.