शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

टायर फुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली, ऐतवडे खुर्दमधील जखमी नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:37 IST

कुरळप : वाठार (ता. कऱ्हाड) येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर आदळली. या अपघातात जखमी झालेल्या ऐतवडे ...

कुरळप : वाठार (ता. कऱ्हाड) येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर आदळली. या अपघातात जखमी झालेल्या ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील स्वरदा संदीप पाटील (वय ९) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काल, बुधवारी घडली. कऱ्हाड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.ऐतवडे खुर्द येथील शिवराज विद्यालयात संदीप गणपती पाटील सहाय्यक शिक्षक आहेत. बुधवारी रात्री ते त्यांची पत्नी, मुलगी स्वरदा व दीड वर्षाच्या मुलासह मोटारीने (एमएच ०९ बीएच ३३६३) ऐतवडे खुर्द येथून कऱ्हाडकडे नातेवाइकांकडे निघाले होते.वाठारनजीक अचानक गाडीचा पुढील टायर फुटल्याने संदीप पाटील यांचा मोटारीवरील ताबा सुटला. यात मोटार रस्त्याकडेच्या दुभाजकावर आदळली. यात पुढील सीटवर बसलेल्या स्वरदाला गंभीर दुखापत झाली. मोटारीतील अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल केले. परंतु उपचारादरम्यान स्वरदाचा मृत्यू झाला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात