जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:13+5:302021-01-08T05:29:13+5:30

सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्यादिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. यात ९ ...

Nine Gram Panchayats in the district without opposition | जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध

जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध

सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्यादिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. यात ९ ग्रामपंचायती बिनविराेध होण्यास यशस्वी झाल्या आहेत. इतर उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे.

सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्यादिवशी जिल्ह्यात ग्रामपंचायतींसह काही जागाही बिनविरोध झाल्या आहेत. त्यानुसार तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी, नरसेवाडी व कौलगे, आटपाडी तालुक्यात पात्रेवाडी, तांदळगाव, भडकेवाडी (ता. खानापूर), मोघमवाडी (ता. कवठेमहांकाळ), जत तालुक्यातील लमाणतांडा (उटगी) आणि टोणेवाडी बिनविरोध झाल्या आहेत.

खानापूर तालुक्यात पारे येथे ११ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मसुचीवाडी (ता. वाळवा) येथे ११ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या, तर तिकोंडी (ता. जत) येथील ११ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

Web Title: Nine Gram Panchayats in the district without opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.