राष्ट्रवादीच्या क्रिकेट स्पर्धेत निलेवाडी संघाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:04+5:302021-03-04T04:50:04+5:30

आष्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघाला दिलीप वग्यानी, विराज शिंदे, विजय मोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण ...

Nilewadi team wins NCP cricket tournament | राष्ट्रवादीच्या क्रिकेट स्पर्धेत निलेवाडी संघाचा विजय

राष्ट्रवादीच्या क्रिकेट स्पर्धेत निलेवाडी संघाचा विजय

आष्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघाला दिलीप वग्यानी, विराज शिंदे, विजय मोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अमित ढोले, विश्वजीत पाटील, माणिक शेळके, व्हि. डी. पाटील, राजकेदार आटुगडे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया यांच्यावतीने आयोजित केलेल्या हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत निलेवाडी स्पोर्ट संघाने विजेतेपद पटकावले. निलेवाडी स्पोर्टसच्या संघाने शिवनेरी (तांदुळवाडी) संघावर मात करीत प्रथम क्रमांक पटकावून नामदार चषकावर नाव कोरले.

जय हनुमान तांदळवाडी या संघाने तृतीय तर अधिष्ठा ग्रुप आष्टा संघाने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी, माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, युवक नेते अमित ढोले, नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राजकेदार आटुगडे, विश्वजीत पाटील, विराज शिंदे, व्ही. डी. पाटील, माणिक शेळके, सतीश माळी, अर्जुन माने, अनिल पाटील, विकास बोरकर, धैर्यशील थोरात, उदय कुशिरे, शिवाजी चोरमुले आदी उपस्थित होते.

Web Title: Nilewadi team wins NCP cricket tournament