आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात एनजीओनी सहभागी व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:49+5:302021-09-06T04:29:49+5:30
ओळी :- आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत महापालिकेत सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी दत्तात्रय लांघी, डाॅ. रवींद्र ...

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात एनजीओनी सहभागी व्हावे
ओळी :- आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत महापालिकेत सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी दत्तात्रय लांघी, डाॅ. रवींद्र ताटे, अविनाश पाटणकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासनाच्यावतीने २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शहरातील सामाजिक संस्था, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी केले.
महापालिकेत सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छ सर्वेक्षणच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षा चव्हाण, पर्यावरण अभियंता वैष्णवी कुंभार उपस्थित होते. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत प्रभागनिहाय नागरिकांसाठी शिबिरांचे आयोजन करावे, ओला व सुका कचरा वेगळा देण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी प्रबोधन करावे आणि आझादी का अमृत महोत्सवांतर्गत महापालिकेकडून आयोजित कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन लांघी यांनी केले. या बैठकीला नागरिक जागृती मंच, आभाळमाया फाऊंडेशन, निर्धार फाऊंडेशनचे राकेश दड्डेनावर, पर्यावरण संरक्षण गतविधीचे डॉ. मनोज पाटील, सौरभ मराठे, पर्यावरणप्रेमी सतीश दुधाळ, रोहन कोठारी, कृष्णाजी प्रतिष्ठानचे प्रतिनिधी उपस्थित होते.