Newlywed commits suicide due to father-in-law's trouble in Ashta | आष्ट्यात सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

आष्ट्यात सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

आष्टा : येथील नवविवाहितीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. अनुजा अवधूत माळी (वय २३, रा. आष्टा, माळी मळा) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवार, दि. २१ रोजी सकाळी घडली. अनुजाचे वडील सुकुमार दत्तात्रय पाटील यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे.

आष्टा येथील अवधूत माळी याच्यासोबत कांडगाव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील अनुजा हिचा २२ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला होता. १३ जानेवारी रोजी संक्रांतीनिमित्त ती माहेरी गेली होती. यावेळी तिने सासरचे लोक लग्नात मानपान केला नाही म्हणून त्रास देतात तसेच पती मारहाण करत आहे, असे सांगितले होते.

संक्रांतीनंतर सोमवार, दि. १८ रोजी पती, सासू, सासरे, चुलत दीर, चुलत जाऊ आल्यानंतर त्यांचा मानपान करून त्यांच्यासोबत अनुजाला सासरी पाठवले होते. सुकुमार पाटील यांचे मेहुणे नारायण चौगुले यांनी मंगळवार, दि. १९ रोजी रात्री साडेआठच्यादरम्यान अनुजाला फोन केला असता तिने सासरी पटवून घेत नसल्याचे सांगितले.

यानंतर गुरुवार, दि. २१ रोजी सकाळी ८ च्या सुमारास संजय माळी यांनी अनुजाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळवले. अनुजा हिने पती अवधूत माळी, सासरे संजय माळी, सासू वंदना माळी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद सुकुमार पाटील यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव करीत आहेत.

Web Title: Newlywed commits suicide due to father-in-law's trouble in Ashta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.