खानापूर तालुक्यातील १३ गावात नवे कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:12+5:302021-02-11T04:28:12+5:30
पोसेवाडीच्या सरपंचपदी अंकुश ठोंबरे, तर उपसरपंचपदी सागर जाधव यांची निवड झाली. मंगरूळ येथे अंजली कुंभार यांची सरपंच व माजी ...

खानापूर तालुक्यातील १३ गावात नवे कारभारी
पोसेवाडीच्या सरपंचपदी अंकुश ठोंबरे, तर उपसरपंचपदी सागर जाधव यांची निवड झाली. मंगरूळ येथे अंजली कुंभार यांची सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य रामरावदादा पाटील यांचे नातू अभिजित पाटील यांना उपसरपंचपदाची संधी मिळाली. शेडगेवाडी येथे चंद्रभागा कदम सरपंच, तर ज्योतीराम माने उपसरपंच झाले. देविखिंडी येथे रुक्मिणी निकम यांची सरपंचपदी, तर लक्ष्मी केंगार यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने येथे महिलाराज अवतरले आहे. भडकेवाडी येथे सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे येथे गुप्त मतदान घेण्यात आले. सरपंचपदासाठी संजय पाटील यांना ४, तर विरोधी गणेश जाधव यांना ३ मते मिळाल्याने संजय पाटील यांना सरपंच म्हणून घोषित केले. उपसरपंचपदासाठी संगीता जाधव यांना ४ व कांचन पवार यांना ३ मते मिळाल्याने संगीता जाधव यांना उपसरपंच म्हणून घोषित केले. तांदळगावची निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंचपदी पुष्पाताई शिरतोडे व उपसरपंचपदी वैशाली चव्हाण यांची निवड झाली. भिकवडी बुद्रुक येथे शोभा शेळके यांची सरपंच, तर धनाजी तामखडे यांची उपसरपंचपदावर निवड झाली. नागेवाडीत सरपंचपदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम व उपसरपंचपदी विजय कचरे यांची निवड करण्यात आली. पारे येथे मालन साळुंखे यांची सरपंच, तर सुभाष पाटील यांची उपसरपंचपदावर वर्णी लागली. रेणावी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी इम्ताज शिकलगार यांची बिनविरोध निवड झाली. परंतु, उपसरपंचपदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले. यात कुमार दिनकर पवार यांना पाच, तर सुनीता गुजले यांना चार मते मिळाल्याने पवार यांना विजयी घोषित करण्यात आले. दरम्यान, खंबाळे (भा.) येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव होते. परंतु, या प्रवर्गातील सदस्य असूनही त्यापैकी कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले, तर उपसरपंचपदी अमोल बाळासाहेब सुर्वे यांची निवड झाली. त्यामुळे सुर्वे हे प्रभारी सरपंच म्हणून काम पहाणार आहेत. मेंगाणवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले असून, उपसरपंचपदी कुबेर जाधव यांची निवड झाली आहे. खानापूर तालुक्यातील १३ पैकी सहा ग्रामपंचायतीत महिलांना सरपंच पदाची संधी मिळाली आहे.
फोटो - १००२२०२१-विटा-प्रणव पाटील, माहुली सरपंच.
फोटो - १००२२०२१-विटा-सौ. वंदना माने, माहुली उपसरपंच.