मजूर सोसायट्यांच्या जुन्या कामांना नवी नियमावली लागू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:20+5:302021-02-09T04:30:20+5:30

मजूर सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी सतीश देशमुख, किरण लाड, सुनील ताटे, विठ्ठल खोत, महादेव पाटील यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी अध्यक्ष कोरे, ...

The new rules do not apply to the old work of labor societies | मजूर सोसायट्यांच्या जुन्या कामांना नवी नियमावली लागू नाही

मजूर सोसायट्यांच्या जुन्या कामांना नवी नियमावली लागू नाही

मजूर सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी सतीश देशमुख, किरण लाड, सुनील ताटे, विठ्ठल खोत, महादेव पाटील यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी अध्यक्ष कोरे, सदस्य शरद लाड यांची भेट घेतली. यावेळी डुडी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांच्याशी चर्चा केली. सोसायट्यांना कामांचा कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी संस्थेची पात्रता निश्चित करण्यासाठी गुडेवार यांनी नियमावली तयार केली आहे. त्याबाबतचे आदेश २८ डिसेंबर रोजी दिले आहेत. त्यानंतर २८ डिसेंबरपूर्वी झालेल्या कामांनाही तीच नियमावली लावली जात असल्याने बिले अडकली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जुन्या कामांना नव्याने अंमलात आणलेली नियमावली लावता येणार नाही, तसे आदेश दिले जातील, असे आश्वासन गुडेवार यांनी दिले. बैठक संपल्यानंतर पदाधिकारी जिल्हा परिषदेबाहेर पडण्यापूर्वीच त्याबाबतचे आदेश गुडेवार यांनी काढले. पूर्वीच्या कामाची अडकलेली बिले मिळण्यातील अडथळा दूर झाल्याने दिलासा मिळाला.

फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने करण्यात आलेल्या नियमावलीतील क्लिष्टता व त्यामुळे कामात येणाऱ्या अडचणी डुडी यांच्यासमोर मांडल्या. मात्र डुडी यांनी नियम सोडून काही होणार नाही. त्रासदायक प्रश्न सोडविले जातील, असे सांगितले.

Web Title: The new rules do not apply to the old work of labor societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.